Ad will apear here
Next
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण
कामगार कल्याण केंद्रात वृक्षारोपण करताना प्रमुख पाहुणे आणि मान्यवर
कामठी (नागपूर) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षलागवड, संगोपन व जनजागृती सप्ताहांतर्गत येथील कामगार कल्याण केंद्रामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी चित्रप्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते.

 कामठी येथील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेक मंगताणी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका पिंकी वैद्य उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती शिशुमंदिर मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. 

पुष्पलता कायरवार, चंद्रकांत चौबे, डॉ. मंगताणी, शर्मा, किशोर खेडकर, कामगार कल्याण अधिकारी प्रदीप चिकाटे, प्रतिभा भाकरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधर्मा खोडे यांनी केले. केंद्रप्रमुख हेमंत जौंजाळ यांनी आभार मानले. 

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कांचन वाणी, सचिन वंजारी, प्रकाश कोहळे, अशोक अहेर, शुभदा गळघटे, सुरेश बेलसरे, संदीप विहारे, शुभांगी सावरकर, दर्शन सोमकुवर, कविता लोखंडे, मंदा वाहाणे यांनी परिश्रम घेतले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZRNBE
Similar Posts
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा वर्धापनदिन वृक्षारोपण करून साजरा नागपूर : कामगारांच्या सर्वांगीण विकासाचा वसा घेतलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने ६४ वर्षे पूर्ण करून ६५व्या वर्षात मोठ्या थाटामाटात पदार्पण केले. या गौरवशाली परंपरेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागाच्या वतीने राजे रघुजीनगर येथील कामगार कल्याण भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
‘भाऊसाहेबांच्या जाण्याने शेतकऱ्यांचे नुकसान’ नागपूर : ‘भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबीर नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ६१व्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे. शिबिरातील रक्ताचे संकलन डॉ. हेडगेवार रक्तपेढीकडून करण्यात येणार आहे
प्रभाग क्रमांक १७ मध्ये वृक्षारोपण नागपूर  : येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये स्पाईन रोड शेजारील मोकळ्या जागेत १ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक नामदेव ढाके, सचिन चिंचवडे , नगरसेविका करुणा चिंचवडे, महानगरपालिका कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून जगवू या, अशी ग्वाही दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language